खासगी रुग्णालयांचे व्यापारीकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 12:11 AM2021-11-08T00:11:30+5:302021-11-08T00:12:06+5:30

जानोरी : खासगी रुग्णालयांचे व्यापारीकरण व मेडिकल स्टोअर्समधील औषधांच्या किमतीत होणाऱ्या तफावतीबाबत लक्ष केंद्रित करून सर्वत्र सारख्याच व योग्य किमतीत मिळावे यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव काठे व तालुका उपाध्यक्ष शरद काठे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Stop the commercialization of private hospitals | खासगी रुग्णालयांचे व्यापारीकरण थांबवा

खासगी रुग्णालयांचे व्यापारीकरण थांबवा

Next
ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन

जानोरी : खासगी रुग्णालयांचे व्यापारीकरण व मेडिकल स्टोअर्समधील औषधांच्या किमतीत होणाऱ्या तफावतीबाबत लक्ष केंद्रित करून सर्वत्र सारख्याच व योग्य किमतीत मिळावे यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव काठे व तालुका उपाध्यक्ष शरद काठे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

नाशिक येथील रुग्णालये विशेषतः कॉर्पोरेट आणि समतुल्य खासगी रुग्णालये एक प्रकारचे भावनिक ब्लॅकमेल करून रुग्णांच्या भावनांनी खेळत आहेत. हे लक्षात आले आहे की, खासगी रुग्णालयांमध्ये खूप जास्त ओपीडी आणि व्हिजिट शुल्क, इतर शुल्क तसेच कोणतेही मनमानी चार्जेस लावण्यात येतात. शुल्कासंबंधी कोणताही तक्ता दर्शविलेला नसतो. मोठमोठे बिल हाती देऊन ते मुख्य डॉक्टर उपलब्ध नसताना भरण्यास सांगितले जाते. मुख्य डॉक्टर आल्यावर काही रक्कम कमी केली जाते किंवा सहायकाशी बोलण्यास सांगितले जाते. प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना विनाकारण त्रास दिला जातो.

तसेच त्यांच्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये औषधांमध्ये जास्त किंमत आकारली जाते. तीच औषधे बाहेरून घेतल्यावर त्याच ब्रँडचे औषध कमी किमतीत मिळते. त्यामुळे या ज्वलंत समस्येवर मात करण्यासाठी आणखी काही उपाययोजनांसह सर्व रुग्णालयांमध्ये त्यांच्या शुल्काचा तक्ता लावणे सक्तीचे करणे, अत्यावश्यक सेवांमधील व्यावसायिकरण आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हॉस्पिटलचे त्यांच्या सुविधेनुसार वर्गीकरण करून शुल्क निश्चिती करावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


खासगी रुग्णालयांचे व्यापारीकरण थांबविण्याच्या मागणीचे निवेदन डॉ. भारती पवार यांना देताना शंकरराव काठे व शरद काठे.

Web Title: Stop the commercialization of private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.