पाणी आरक्षणासाठी कॉँग्रेसचा रास्ता रोको

By admin | Published: November 26, 2015 10:11 PM2015-11-26T22:11:02+5:302015-11-26T22:11:44+5:30

पाणी आरक्षणासाठी कॉँग्रेसचा रास्ता रोको

Stop the Congress's path for water reservation | पाणी आरक्षणासाठी कॉँग्रेसचा रास्ता रोको

पाणी आरक्षणासाठी कॉँग्रेसचा रास्ता रोको

Next

आझादनगर : मालेगाव शहरासाठी गिरणा धरणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाची पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यापूर्वी बुधवारी (दि. २५) सकाळपासून गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी आवर्तन सोडण्यात आले याचा निषेध म्हणून आज महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार आसिफ शेख यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मालेगावकरांना ८०० दलघफू पैकी फक्त १५० दलघफू पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. मालेगाव शहराची लोकसंख्या सात लाख ३० हजार आजमितीस आहे. गिरीश महाजन यांनी मालेगाव शहरासाठी गिरणा धरणातून ४०० दलघफू पाणी आरक्षित करण्याचे आश्वासन आमदार आसिफ शेख यांना दिले होते. तथापि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वीच व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करताच बुधवारी सकाळी ६ वाजेपासून गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत मालेगाव शहरास गिरणा धरणातून पाणी आरक्षणाबाबत लेखी स्वरूपात आदेश होत नाही तोपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसाठी आज आंदोलन छेडण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर तथा स्थायी समिती सभापती ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक विठ्ठल बर्वे, असलम अन्सारी, गटनेता हाजी खालीद शेख, एजाज वजीर, अ‍ॅड. हिदायतउल्ला अन्सारी, मौलाना जाहीद नदवी, मौलाना अय्युब कासमी, नगरसेविका फातमा मो. हारुण, यास्मीन कलीम अहमद, कमरुन्निसा मो. रिजवान, फरिदा खान, सायरा असलम खान, शकीला एकबाल अहमद यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the Congress's path for water reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.