दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको

By Admin | Published: June 6, 2017 02:43 AM2017-06-06T02:43:05+5:302017-06-06T02:43:14+5:30

दिंडोरी : शेतकरी किसान क्रांतीच्या वतीने पुकारलेल्या बंदला दिंडोरी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

Stop the Dindori Sarbakshi Path | दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको

दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : शेतकरी किसान क्रांतीच्या वतीने पुकारलेल्या बंदला दिंडोरी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दिंडोरी शहरासह तालुक्यातील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दिंडोरी येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास पालखेड चौफुलीवर सर्वपक्षीयांनी रास्ता रोको केला. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेना शहरप्रमुख रमेश बोरस्ते, माजी सभापती सदाशिव शेळके, नरेश देशमुख, रघुनाथ पाटील, सोमनाथ जाधव, रणजित देशमुख, दत्तात्रेय शेळके, नरेंद्र पेलमहाले, संजय बोरस्ते, रावसाहेब बोरस्ते, उल्हास बोरस्ते, माकपचे तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी, रवींद्र मोरे, रणजित देशमुख, जयश्री सातपुते आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी भाजपा सरकार हे शेतकऱ्यांमध्ये फुट पडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अजूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. नितीन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्या सरकारने मान्य करायलाच पाहिजे असे विचार मांडले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दिवसभर संपूर्ण व्यापारी विक्रेते यांनी दुकाने बंद ठेवत शेतकरी बंदला पाठींबा दिला. या वेळी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता.
शेतकऱ्यांच्या या संपात किसान सभाही उतरली असून या संघटनेत सर्वाधिक शेतमजूर असून त्यांनी रास्त रोको आंदोलनात सक्र ीय सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी किसान सभेच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
आज शेतकरी किसान क्र ांती मोर्चाने बंदची हाक दिल्याने यात तालुक्यातील भारतीय किसान सभा सामील झाली होती. किसान सभेच्या वतीने बाजार समिती पटांगण ते तहसील कार्यालयावर कॉ सुनील मालसुरे, तालुका सेक्र ेटरी रमेश चौधरी, दौलत भोये, लक्ष्मीबाई काळे, अनिता कुवर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, या वेळी तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना निवेदन देण्यात आले,
तालुक्यातील मोहाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली येथे जि. प. सदस्य प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, विलास पाटील, राजेंद्र कळमकर, संजय गोवर्धने, रामभाऊ मौले यांसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. यावेळी दुध रस्त्यावर ओतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अनेक आंदोलने होत असताना नेहमी शासकीय मालमत्तेचे नुकसान केले जाते मात्र शेतकऱ्यांचे आंदोलना कुठेही शासकीय किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान केले गेले नाही फक्त संप काळात शेतमाल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून विविध मार्गांवर करण्यात आला. यावेळी काही ठिकाणी शेतमाल रस्त्यावर फेकत निषेध झाला. काही ठिकाणी काही युवकांनी आततायी पणा केला मात्र कुणालाही मारहाण किंवा वाहनांचे नुकसान केले गेले नाही. परंतु पोलिसांनी तिसऱ्या दिवशी सदर शेतमाल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न दंडुक्याच्या जोरावर हाणून पाडल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच्या दडपशाही भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Stop the Dindori Sarbakshi Path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.