रोक डअभावी एटीएम ओस

By admin | Published: April 23, 2017 02:34 AM2017-04-23T02:34:10+5:302017-04-23T02:34:10+5:30

नाशिक : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे.

Stop Dysfunctional ATM Dew | रोक डअभावी एटीएम ओस

रोक डअभावी एटीएम ओस

Next

 नाशिक : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे. रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्ह्यासाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असले तरी प्राप्त चलन अवघे दोन दिवसांतच रोकडअभावी एटीएम ओस पडली असल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. शहरातील एटीएममधील खडखडाटामुळे नागरिकांना वाढत्या उन्हासोबतच चलनटंचाईचा तापही सहन करावा लागणार आहे.
शहरातील चलनटंचाईबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून, एकीकडे नागरिकांना अधिकाधिक कॅशलेस व्यवहारांकडे वळविण्यासाठी आरबीआयकडून जाणीवपूर्वक रोकड दिली जात नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे तर रोख व्यवहारावरील सेवाकर आकारण्यासाठी बँकांकडून जाणीवपूर्वक एटीममध्ये रोकड जमा करण्याचे टाळून ग्राहकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा मतप्रवाहही व्यक्त होत आहे. नोटाबंदीच्या काळात चलनटंचाई निर्माण झाल्यामुळे एटीएमसमोर रांगा लागत होत्या.
परंतु, सध्या स्थिती वेगळी आहे. बहुतेक एटीएमबाहेर बंदचे फलक लागलेले नसले तरी एटीएममध्ये पैसेच मिळत नाही. तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याची प्रतिक्रिया एटीममधून प्राप्त होत असल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे.
पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर सहा महिने उलटले तरीही आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आले नाहीत. नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ५० टक्क्यांवर एटीएमही बंद झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Stop Dysfunctional ATM Dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.