सटाण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:40 AM2018-06-03T00:40:06+5:302018-06-03T00:40:06+5:30
सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.

गेल्या दोन दिवसापासून शेतकºयांनी देशव्यापी संप पुकारला आहे. भाजीपाला, कांदा, दूध आणि धान्य विक्री व वाहतुकीला संपकरी शेतकºयांनी मज्जाव केला आहे. आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी मोरेनगर जवळ एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. संतप्त महिला शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून देत निषेध व्यक्त केला.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे यांनीदेखील आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. जिल्हा उपप्रमुख सोनवणे यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे. शेतकºयाला मातीमोल भावाने ैआपला शेतमाल विकावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांना मागण्यांचे निवेदन सादर करून शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात शेतकरी संघाचे सभापती प्रल्हाद पाटील, प्रवीण बळीराम सोनवणे, दोधा मोरे, सरपंच सुरेश जाधव, कैलास बोरसे, बाळासाहेब देवरे, बाळासाहेब मोरे, भरत अहिरे, सुरेश अहिरे, मुरलीधर खैरनार, मधुकर देवरे, दºहाणेचे सरपंच परशराम पाकळे, मुरलीधर खैरनार, रवींद्र वाघ, रवींद्र अहिरे, प्रकाश मोरे, धर्मेंद्र बागुल, सुनील मोरे यांच्यासह महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.
वारंवार होणारा अवकाळी पाऊस, ,गारपीट या अस्मानी संकटाला तोंड देत कष्टाने शेतमाल पिकवतो. मात्र तोच माल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयाच्या पदरात उत्पादन खर्चदेखील पडत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होऊन नैराश्यातून तो मृत्यूला कवटाळत आहे. सरकारने शेतकºयांना आणि शेती व्यवसायाला वाचवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे..