पाण्यासाठी मेशीकरांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 02:30 PM2019-09-13T14:30:14+5:302019-09-13T14:30:22+5:30
मेशी : गावाचा पाणीपुरवठा असणारा पाझर तलाव नं. १ पूर्ण भरून मिळावा या मागणीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून गुरूवारी आंदोलन केले.
मेशी : गावाचा पाणीपुरवठा असणारा पाझर तलाव नं. १ पूर्ण भरून मिळावा या मागणीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून गुरूवारी आंदोलन केले. त्याच दिवशी मेशी धोबीघाट येथे ग्रामस्थांनी रास्त रोको केला. परंतु तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ व पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी मध्यस्थ करून नागरिकांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. यानंतर ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. डी. बाविसकर यांना आंदोलन स्थळी बोलावले आणि ग्रामस्थांना त्यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त केल्या. चणकापूर वाढीव कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांना पाणी सोडले जात असताना मेशीला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या २५ वर्षांपासून देवळा पूर्व भागातील गावांना चणकापूर वाढीव कालव्याचे पाण्याचे आशावादी ठेवून निराशा केली आहे. मेशी गावाला नेहमीच आॅक्टोबर मिहन्यांपासून टॅकरने पाण्याची सोय करावी लागते. मेशीसाठी गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर पासून विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. यंदा अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने मेशीचे सर्व पाझरतलाव कोरडेठाक आहेत. आता तलाव भरून दिल्यास किमान दोन वर्षे या गावाचा पाणी टंचाई दुर होणार आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती केदा शिरसाठ, बाजार समितीचे संचालक साहेबराव सुर्यवंशी, उपसरपंच भिका बोरसे, माजी सरपंच बापू जाधव, ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, श्रीराम बोरसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिरसाठ, समाधान गरूड आदींसह गावकरीही उपस्थित होते.