सक्तीची वीज बिल वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:30+5:302021-02-11T04:15:30+5:30
सिन्नर : कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. थकबाकी ...
सिन्नर : कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, ही सक्तीची वीज वसुली थांबविण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुष्काळ, नापिकीमुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच गेल्यावर्षी पाऊस झाला तरी कोरोनामुळे शेतीतून उत्पादित झालेल्या मालाला भाव मिळाला नाही. महावितरणच्या वतीने मात्र शेतकऱ्यांच्या नावे अवाच्या सव्वा थकीत वीज देयके दाखविण्यात आली असून, ती वसूल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे रोहित्र बंद करण्याचे धोरण महावितरणने हाती घेतले आहे. महावितरणने सक्तीची वीज वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा, जळालेले रोहित्र २४ तासांत बदलून देण्याची व्यवस्था करावी; अन्यथा सिन्नर- शिर्डी मार्गावर १३ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, भाऊसाहेब बैरागी, कचरू निकम, प्रकाश पेखळे, जगदीश पांगारकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
100221\10nsk_11_10022021_13.jpg
===Caption===
सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना वीजप्रश्नी निवेदन देतांना विलास पांगारकर, कार्यकर्ते व शेतकरी कार्यकर्ते.