येवला तालुका दुष्काळी जाहिर करून सक्तीची वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:50 PM2018-09-25T18:50:09+5:302018-09-25T18:51:41+5:30
येवला : येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, कांदा यासारखी रब्बीची पिके उभी केली. बॅन्क आणि सोसायटीकडून कर्ज उपलब्ध होत नसताना उधार उसनवार, किंवा सावकारी कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केला. मात्र योग्य असा पाऊस न पडल्याने पिक करपुन गेली. काही ठिकाणी फक्त चारा होईल, जेमतेम पाटाखालील काही भागात वीसपंचवीस टक्के खरिप पिक हातात येण्याची स्थिती आहे.

शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकासाठी भरमसाठ खर्च करून भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला तरी मायबाप सरकार मुग गिळून गप्प बसले असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
पावसाळ्यात येवले तालुक्यात २९ गाव आणि १९ वाड्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालु आहेत. पालखेड डाव्या कालव्यावरील ओव्हर फ्लोच्या रोटेशनमुळे पंधरा वीस टक्के भागात नदीवरील बंधारे भरून दिले असले तरी ते पाणी एक महिन्याच्यावर पिकांना जीवदान देऊ शकत नाहीत.
शेतकºयांच्या वस्तीवर पिण्यासाठी व जनावरांसाठी बोअरवेल शिवाय पाण्याची सोय नाही. मात्र विज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याची मोहीम हाती घेऊन शेतकºयांना जगणे मुश्किल केले आहे. या मोहिमेविरोधात शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदन मंगळवारी शेतकरी संघटनेने येवला उप विभागीय अधिकारी दराडे, तहसिलदार वारूळे, आमदार छगन भूजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे तसेच भाजप तालुका अध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष यांना देण्यात आले.
निवेदनातील मागण्या अशा येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. दुष्काळाच्या सुविधा तालुक्यातील जनतेला मिळवून द्याव्यात. बील वसुली, बॅन्केची कर्ज वसुली त्वरित थांबवा, कांद्याला किमान दोन हजार भाव जाहीर करून शेतकºयांने विकलेल्या कांद्याची फरकाची रक्कम त्याच्या खात्यात जमा करावी, टोमॅटोसाठी पाकिस्तान, बांगलादेश बॉर्डर खूली करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या देशात त्यांचा कांदा,साखर, आंबा येऊ शकतो मग आपले टोमॅटो का पाठवत नाही? कांदा पिकाला उत्पादन खर्चावर अधारित रास्त भाव मिळण्यासाठी आयात निर्यात धोरणात सातत्य राखून नविन बाजार शोधून संबंधित देशांशी करार करावे, कायद्याला किमान दोन हजार रु पये क्विंटल भाव द्यावा आदी मागण्या आहेत.
शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, तालुकाध्यक्ष अरूण जाधव, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश सोमवंशी, बापूसाहेब पगारे, जाफर पठाण, बाळासाहेब गायकवाड, अनिस पटेल, सुभाष सोनवणे, शंकर पुरकर, दत्तात्रय मोगल, दत्तु सादडे, सुरेश जेजूरकर, भगवान बोराडे, सतिश जगझाप, जयराम वर्पे, वसंत पवार आदी उपस्थित होते.