गोदा-नंदिनीतील सांडपाणी रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:15 AM2018-03-22T00:15:40+5:302018-03-22T00:15:40+5:30
गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेला दिले आहेत. याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे.
नाशिक : गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेला दिले आहेत. याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे. नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनात झालेल्या बैठकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेच्या अधिकाºयांना याबाबत आदेशित केले. गेल्या तीन वर्षांपासून आमदार वारंवार पाठपुरावा करत असताना अधिकारी वर्गाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या सहा महिन्यांत सदर सांडपाणी रोखावे. ही अखेरची मुदत असून, त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक येथील औद्योगिक वसाहतीत सीईटीपी उभारणी बाबत फरांदे यांनी विचारणा केली असता त्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर केला नसल्याचे समोर आले. सातपूर औद्योगिक वसाहतीत २७४ कारखाने व अंबड औद्योगिक वसाहतीत ४०४ कारखाने सुरू असताना औद्योगिक विकास महामंडळाने सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही, हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांत सातपूर व अंबड येथे गटार व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देणेकामी औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना सूचना देण्याचे अन्यथा कार्यवाही करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना दिले. बैठकीला अवर मुख्य सचिव गवई, डॉ. अमर सुपाते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके, नाशिक महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे आदींसह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.