सटाण्यात वकील संघाचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:22 AM2018-06-11T02:22:08+5:302018-06-11T02:22:08+5:30

सटाणा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी व शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या बागलाण वकील संघाने रविवारी (दि.१०) दुपारी शहरातील बसस्थानकासमोर रस्त्यावर उतरून तब्बल एक तास साक्र ी-शिर्ड राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक रोखून धरली.

Stop the lawyer's path in the hall | सटाण्यात वकील संघाचा रास्ता रोको

सटाण्यात वकील संघाचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला पाठिंबाएक तास वाहतूक ठप्प

सटाणा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी व शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या बागलाण वकील संघाने रविवारी (दि.१०) दुपारी शहरातील बसस्थानकासमोर रस्त्यावर उतरून तब्बल एक तास साक्र ी-शिर्ड राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक रोखून धरली. आंदोलनाचे नेतृत्व वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांनी केले.
शेतकºयांच्या न्यायिक मागण्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वकील संघाने त्यांचा धिक्कार करत रविवारी दुपारी वकिलांनी शहरातील बसस्थानकासमोर ठिय्या दिला.
प्रांताधिकारी प्रवीण महाजन, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका वकील संघाने घेतली. प्रांत महाजन यांनी आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य हिरामण सोनवणे, अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, यशवंत सोनवणे, नीलेश डांगरे, संजय शिंदे, चंद्रशेखर पवार, चंद्रकांत अहिरे, दत्ता क्षीरसागर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Stop the lawyer's path in the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.