थांब लक्ष्मी कुंकू लावते,

By Admin | Published: September 26, 2015 11:16 PM2015-09-26T23:16:13+5:302015-09-26T23:16:46+5:30

येवल्याच्या पैठणीचा अहेर करते!

Stop Laxmi kumku, | थांब लक्ष्मी कुंकू लावते,

थांब लक्ष्मी कुंकू लावते,

googlenewsNext

बाईसाहबाला शिवीन म्हटलं चोळी
पन शिंप्याची बंद झाली आळी
मी काय चोळी
सिवन्याजोगी नव्हती व्हई?
एकनाथी भारुडातली ही बाईसाब म्हणजे नणंद. नणंद म्हटलं की अत्यंत खाष्ट आणि कजाग बाई. किती खाष्ट आणि किती भांडकुदळ, तर
‘नंदेचं कार्ट किरकीर करतंय
खरुज होऊ दे त्याला
भवानी आई रोडगा व्हाईन तुला’
पण सगळ्या नणंदा अशा खाष्ट नसतात आणि भावजयादेखील एकनाथांनी वर्णिल्याप्रमाणे डांबीस आणि लबाड नसतात.
काही नणंदा म्हणजे मूर्तीमंत ‘आनंद’ आणि भावजया तर साक्षात ‘देव्याच’. देव दिनाघरी धावला असं काहीसं भगवंत आणि सुदाम्याविषयी म्हणतात म्हणे. पण इथे तर साक्षात आनंदमूर्तीच देवीघरी धावली. तीदेखील बहुधा नणंदेच्या रुपात आणि तेही माहेरपणाला.
माहेरपणाला आलेल्या माहेरवासणीला दोन दिवस थांबवून घेणं, तिला गोडाधडाचं खाऊ घालणं आणि तिची सासरी पाठविताना खण-नारळ, चोळी-बांगडी किंवा जे काही ऐपतीत बसेल आणि परवडेल ते देऊन तिचा आदर सत्कार करणं देवीस्वरुप भावजयीचं कर्तव्य ठरतं. सगळ्याच नणंदा आणि साऱ्याच भावजया एकनाथांना गवसल्या तशा नसतात.
पण भावजयी देवीस्वरुप झाली म्हणून काय झालं? ऐपतही रग्गड असली म्हणून काय झालं? परवडण्या बिरवड्याण्याचा प्रश्न नसला म्हणून काय झालं? अखेर भावजयी पडली बाईमाणूस. तिची तर नणंद माहेरपणाला आलेली. पण तिच्या भावांची तर साक्षात जिवाभावाची बहीण माहेरपणाला आलेली. मग त्यांचे काही कर्तव्य आहे की नाही?
त्यातून ते सारे म्हणजे काही,
निस्ती कळण्याची भाकर
अन आंबाड्याची भाजी
खाणारे नव्हत!
एकसे एक सारे तालेवार. कुणी शेतसारा वसूल करणारे, कुणी चोरा-चिलटांचा बंदोबस्त करणारे, कुणी ब्यँकांचा बंदोबस्त करणारे, तर कुणी काय अन कुणी काय. खरं तर त्यानी साऱ्यानी आपणहून पुढे व्हायचं. बहिणीला काय हवं काय नको हे विचारायचं. बाई तुला माहेरची ईरकल हवी, येवल्याची पैठणी हवी, सराफाकडचा एखादा डाग हवा का आणखी काय हवं, हे नुसतं विचारायचं नाही, तर आणून तिच्या ओच्यात ओटी म्हणून टाकायचं. पण कसचं काय आन फाटक्यात पाय.
पण म्हणतात ना, गुराख्यानं सोडलं म्हणजे मालकाला सोडून चालत नाही. लाज देवीस्वरुप भावजयीलाच वाटली. नणंदेचा आदर सत्कार करु, तिची चांगली पाठवणी करु म्हणजे ती तिच्या सासरी जाऊन आपलं कौतीक करील आणि उद्या तिच्याकडंच जायचं वेळ आली तर एक पाट सात ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असा भला विचार करुन भावजयीनी आपल्या साऱ्या दिरांना कामाला लावलं. एकेकाला एकेक जिन्नस नेमून दिला. खनपटी बसून तो त्यांच्याकडून आणवून घेतला. पण तरीही ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ म्हणणाऱ्या या बिलंदर भावांची कुरकर सुरुच. एकनाथांना जर हे समजलं असतं तर ते लगेच म्हणाले असते,
नंदेची भाचरं कुरकुर करत्यात
पटकी होऊं दे त्याना
आनंदीबाई
पैठणी नेसवीन तुला

Web Title: Stop Laxmi kumku,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.