लोहोणेरला सर्वपक्षिय रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 04:39 PM2018-06-07T16:39:30+5:302018-06-07T16:39:30+5:30
लोहोणेर : - शेती मालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा , दुधाला किमान ५० रु पये प्रति लिटर भाव मिळावा , व स्वामिनाथन आयोग स्वीकारावा तसेच किसान सभेच्या वतीने गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून आज लोहोणेर येथे शिर्डी - साक्र ी महामार्गावर गिरणा नदी पुलाजवळ सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
लोहोणेर : - शेती मालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा , दुधाला किमान ५० रु पये प्रति लिटर भाव मिळावा , व स्वामिनाथन आयोग स्वीकारावा तसेच किसान सभेच्या वतीने गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून आज लोहोणेर येथे शिर्डी - साक् ी महामार्गावर गिरणा नदी पुलाजवळ सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात प्रहार संघटना, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना आदी सह लोहोणेर, विठेवाडी, सावकी, भउर, वासोळं, ठेंगोडा, आदी परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष पंडितराव निकम म्हणाले की, युती शासन हे शेतकरी विरोधी शासन असून त्यांना शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतीचे हित महत्वाचे आहे. शेती मालास मातीमोल भाव मिळत असल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या केल्या जात आहे ही दुर्दैवी बाब आहे.आंदोलन काळात शेती मालाचे नुकसान न करता तो गरीब जनतेला वाटून द्या असे आवाहन करीत सत्ताधारी सरकारच्या मंत्र्यांना व लोकप्रतिनिधीना शेतकर्यांनी रस्त्यावर फिरकू दिले नाही पाहिजे असे सांगितले तर यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख लालचद सोनवणे म्हणाले की, महागाईला या सरकारच्या काळात लगाम घालता आला नाही जो पर्यंत शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवले जाईल. यावेळी झालेल्या आंदोलनात प्रहार संघटनेचे सुरेश जाधव, संजय देवरे, तुषार खैरनार, दर्शन आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, शेतकरी संघटनेचे फुला जाधव ,कारभारी पगार, डॉ . चंद्रकांत पाटील, अशोक अलई, अनिल आहेर, धनाजी निकम, बापू जाधव, रावसाहेब निकम,बापू सावळे, नंदलाल निकम, महेंद्र आहेर, उध्दव निकम , मोठाभाऊ निकम, भाऊसाहेब आहिरे, मनोहर महाजन, मनोज देशमुख, तानाजी निकम,शशिकांत निकम, दिगंबर निकम, पोपट बागुल संजय निकम, केवळ सोनवणे आदीसह लोहोणेर, ठेंगोडा , विठेवाडी, भउर , वासोळं ,खालप, सावकी ,खामखेडा परिसरातील शेतकरी संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन कर्त्याच्यावतीने नायब तहसीलदार अनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले .