मालेगावी रास्ता रोको, कळवणला विराट मोर्चा, पाटोद्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:21 PM2018-08-09T12:21:43+5:302018-08-09T12:22:20+5:30
मालेगाव/पाटोदा/कळवण : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा बांधव व मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येवला तालुक्यातील पाटोदा येथील कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले .
मालेगाव/पाटोदा/कळवण : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा बांधव व मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येवला तालुक्यातील पाटोदा येथील कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले . मालेगावी टेहरे चौफुलीवर दोन तासांपासून रास्ता रोको सुरू असून त्यामुळे महामार्ग ठप्प झाला आहे, तर कळवणमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. पाटोद्यात समाज बांधवांच्या वतीने गावातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. रॅलीनंतर येवला रोडवर धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला.आंदोलकांच्यावतीने ‘एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी व्यापारी व सर्वच व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवत या बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला. या प्रसंगी मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे असे मत शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरणारे, कैलास घोरपडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त करून मराठा समाजाला सर्वच क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली .यावेळी पुंडलिक पाचपुते ,उपसरपंच साहेबराव बोराडे,दिलीप बोरणारे,तुकाराम पिंपरकर, दिलीप बोराडे संपत बोरणारे, गोरख पाचपुते, ज्ञानेश्वर बोरणारे, सुनील बोराडे,बाबासाहेब भुसार,भास्कर बोराडे,विठ्ठल घोरपडे,मच्छिन्द्र पाचपुते,कैलास नाईकवाडे,उत्तम कुंभरकर हरिभाऊ आहेर, दत्तू भुसारे, दत्तू वरे, चंद्रभान नाईकवाडे, उत्तम पाचपुते,योगेश बोराडे,अनिल वाघ, अनिल शिंदे,भाऊसाहेब ढोपरे विजय सोर, अंबादास बोनाटे भरत जाधव, भाउदास बैरागी,बाळासाहेब पिंपरकर, सुदाम बोरणारे, प्रदीप गुजराथी,सुरेश देव्हाडराव,महेश सोनार, संजय बटवल आदींसह मराठा बांधव व इतर समाज बांधव सहभागी झाले होते.आंदोलन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मच्छिन्द्र पठाडे पोलीस हवालदार संजीव कुमार मोरे यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.