बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:24 PM2020-01-05T23:24:49+5:302020-01-05T23:25:20+5:30
मालेगाव बाजार समिती आवारातील मोकळ्या मैदानावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया गुदामाला विरोध दर्शविण्यासाठी चार दिवसापासून बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त गाळेधारक व्यापाºयांनी कॅम्प रोडवरील वाहतूक अडवून रास्ता रोको केला. नवनिर्वाचित राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मालेगाव : मालेगाव बाजार समिती आवारातील मोकळ्या मैदानावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया गुदामाला विरोध दर्शविण्यासाठी चार दिवसापासून बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त गाळेधारक व्यापाºयांनी कॅम्प रोडवरील वाहतूक अडवून रास्ता रोको केला. नवनिर्वाचित राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बाजार समिती कार्यक्षेत्रातील व्यापारी, आडते यांनी बंद पुकारला असून, संचालकांनी मध्यस्थी न केल्याने तोडगा निघू शकलेला नाही. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केल्याने व्यापारी संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून निषेध व्यक्त केला. यावेळी व्यापारी एकजुटीचा विजय असो, मार्केट गेट खुले करा अशा घोषणा देण्यात आल्या.
कॅम्प रस्त्यावर अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. बाजार समितीचे व्यापारी, आडते यांच्यासह आंदोलकांनी राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांचे संपर्क कार्यालय गाठले. भुसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आपण स्वत: व्यापारी संघटनेचे भिका कोतकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. प्रत्येक घरात वाद होतात; दोघांनी एकत्र बसून वाद मिटवायला हवा, आंदोलन करण्यापूर्वी आपण माझ्याशी संपर्क साधला का, असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित करून बाजार समिती संचालक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची एकत्रित समोरा समोर बैठक घेऊन वाद मिटविण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर सोनवणे, विनोद वाघ, संजय घोडके, फकीरा शेख, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.
तोडगा काढण्याचे आश्वासन
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मोकळ्या भूखंडावर गुदाम उभारु नये या मागणीसाठी आंदोलन करणाºया व्यापाºयांनी राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची संपर्क कार्यालयात भेट घेतली. व्यापाºयांशी चर्चा करून भुसे यांनी या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.