नांदगावी रिपाइंचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:26 PM2018-12-10T23:26:38+5:302018-12-10T23:27:33+5:30

नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी येथील औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the Nandgaoni Ripine route | नांदगावी रिपाइंचा रास्ता रोको

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावी रिपाइंच्या वतीने तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी याना निवेदन देताना कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देबुद्धविहार जवळ आंदोलन करण्यात आले.

नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी येथील औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते नागसेन चव्हाण, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास मोरे, नगरसेवक नितीन जाधव, रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव यांच्या नेतृत्वखाली औरंगाबाद राज्यमार्गावर सारनाथ बुद्धविहार जवळ आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सतर्कता म्हणून आंदोलन काळात रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविली. आंदोलनाला भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव यांनीही आपला पाठिंबा दिला. तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी जाफरभाई शेख, संध्या आहिरे, गौतम काकळीज, विनोद आहिरे, राजाभाऊ गुढेकर, आदि उपस्थित होते.
प्रशांत गरूड, दीपक मोरे, कैलास निळे, प्रमोद पगारे, अनिल जाधव, किरण पवार, नीलेश जाधव, विलास लोखंडे, शरद उगले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Stop the Nandgaoni Ripine route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.