विनाअनुदानित शाळांची हेळसांड थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:35+5:302021-04-02T04:14:35+5:30

सिन्नर : वर्षानुवर्षे विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची हेळसांड थांबली पाहिजे, अशी आग्रही भूमिका पदवीधर मतदारसंघाचे आमदार ...

Stop neglecting unsubsidized schools | विनाअनुदानित शाळांची हेळसांड थांबवा

विनाअनुदानित शाळांची हेळसांड थांबवा

Next

सिन्नर : वर्षानुवर्षे विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची हेळसांड थांबली पाहिजे, अशी आग्रही भूमिका पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षकांच्या मेळाव्यात मांडली.

नाशिक जिल्ह्यातील अपात्र शाळांची तपासणी कोठारी कन्या शाळा जेलरोड, नाशिक रोड येथे करण्यात आली. यावेळी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, मुंबई येथील तपासणी अधिकारी ल. वी. सावंत, विष्णू आव्हाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर व सुधीर पगार, प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाचे श्रीधर देवरे, पी. टी. पाटील, जितेन्द्र राठोड आदी उपस्थित होते.

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व अघोषित शाळांना २० टक्के अनुदान लवकरात लवकर घोषित करावे. ४० टक्के अनुदानासाठी आता पात्र होणाऱ्या शाळांना एक महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून द्यावा, अंशत: अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण व वैद्यकीय बिलाचा लाभ मिळावा अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केली आहे. राज्यात आता जवळपास दोन हजार माध्यमिक व ६०० प्राथमिक शाळा होत्या. नोव्हेंबर २०२० पासून ४० टक्के तर १२०० उच्च माध्यमिक व ५०० माध्यमिक शाळा नव्याने २० टक्के अनुदान घेत आहेत. वरील शाळांपैकी किरकोळ कारणावरून अपात्र झालेल्या सर्व शाळांवरील सर्व अधिकाऱ्यांनी बसून सर्व शाळांच्या अडचणी दूर केल्या. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व अपात्र शाळांनी यात सहभाग घेतला.

यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्ता जोंधळे, शांताराम लाठार, महाराष्ट्र टीचर्सच्या शुभांगी पाटील,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष कांतीलाल नेरे, मोहन चकोर, प्रा. डॉ. एस. के. शिंदे, कर्तार-सिंग ठाकुर, सुभाष पवार, मनोज वाकचौरे, महेश देवरे, निलेश गांगुर्डे, शरदचंद्र काकुस्ते, संजय आहेर, दशरथ जाधव, विशाल आव्हाड, हरिराम दिघे, अजित लाठार, अविनाश चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------

फोटोओळी- नाशिक जिल्ह्यातील अपात्र शाळांची तपासणी कोठारी येथे करण्यात आली. त्याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, नितीन उपासनी, ल. वी. सावंत, विष्णू आव्हाड, डॉ. वैशाली झनकर, सुधीर पगार, एस. बी. देशमुख, दत्ता जोंधळे आदी. (०१ सिन्नर १)

===Photopath===

010421\01nsk_9_01042021_13.jpg

===Caption===

०१ सिन्नर १

Web Title: Stop neglecting unsubsidized schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.