देवळ्यात कांदाप्रश्नी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 03:16 PM2018-11-26T15:16:30+5:302018-11-26T15:17:24+5:30
देवळा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, समता परीषद, आदी पक्षांसह कांदा उत्पादक शेतकर्यांनी देवळा येथे पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गावर सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.
देवळा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, समता परीषद, आदी पक्षांसह कांदा उत्पादक शेतकर्यांनी देवळा येथे पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गावर सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य दिपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राजू शिरसाठ, कुबेर जाधव,प्रहार संघटनेने जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, विनोद अहेर, सुभाष पवार, बाळासाहेब पवार, राकाँचे तालुकाध्यक्ष पंडीत निकम, मविप्र सदस्य डॉ. विश्राम निकम, जि.प. सदस्या नूतन अहेर, यशवंत शिरसाठ, जगदीश पवार, संतोष शिंदे,सुनिल अहेर, राजेश अहेर, सतिश सुर्यवंशी, श्रीकांत आहीरराव,उषा बच्छाव, हेमलता खैरणार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलिप पाटील, दिनकर निकम, ज्ञानदेव वाघ, यशवंत खैरणार, श्रावण थोरात, विलास देवरे, निलिमा अहेर आदीसह शेतकरी व महीला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.१५ डिसेंबरपर्यंत कांद्याला हमीभाव मिळाला नाही तर जिल्ह्यात आमदार व खासदारांना गावबंदी केली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी देवळा येथे कांदाप्रश्नावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात दिला.