मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल ये-जा करण्यासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:07 AM2018-02-04T00:07:21+5:302018-02-04T00:24:38+5:30
मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल ये-जा करण्यासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल ये-जा करण्यासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जुन्या पुलाजवळ सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्ण झालेले नसताना जुना पूल बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बंद करण्यात आलेल्या पुलाजवळ सूचनाफलक लावण्यात आलेला नसल्याने रेल्वेस्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत असल्याचे चित्र आहे. मनमाड रेल्वेस्थानकात सर्व सहा फलाट जोडणारा एक पादचारी पूल होता. मात्र सध्या स्टेशनचा विस्तार करून सर्व फलाटांची लांबी वाढविण्यात आली आहे. रेल्वे प्रशानाने पाच वर्षांपूर्वी आणखी एक नवीन पादचारी पूल बांधला. त्यामुळे रेल्वेस्थानकात दोन पादचारी पूल झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली होती. मात्र जुना पादचारी पूल हा कमकुवत झाल्याचे पाहून रेल्वे प्रशासने त्याला खेटून नवीन पादचारी पुलाचे काम सुरु केले. स्थानकाच्या बाहेर कसे पडावे याची माहिती मिळत नसल्यामुळे अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत आहे. रेल्वे प्रशानाने नवीन पुलाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे व बाहेर जाण्यासाठी कसे व कोठून रस्ता
आहे याचे सूचनाफलक बंद करण्यात आलेल्या पुलाजवळ लावण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे सूचनाफलकाअभावी प्रवाशांचा गोंधळ नवीन पूल तयार झाल्यानंतर जुना पूल तोडला जाणार होता; मात्र नवीन पुलाचे काम अपूर्ण असतानाच जुना पूल बंद करण्यात आला. अचानक हा पूल बंद तर करण्यात आलाच शिवाय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सूचनाफलक लावण्यात आला नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.