महागाईविरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:00 AM2017-09-25T00:00:32+5:302017-09-25T00:15:55+5:30

प्रमुख सत्ताधारी असलेले भाजपा सरकार आपली मनमानी करत आमजनतेची फसवणूक करीत असून, कर्जमाफीबाबत शेतकºयांना आॅनलाइनच्या नावाखाली त्रास देत आहे. सद्या महागाईचा भडका उडाला असल्याने जनतेची मोठा भ्रमनिरास झाला आहे. महागाईविरोधात दिंडोरी येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 Stop the path against inflation | महागाईविरोधात रास्ता रोको

महागाईविरोधात रास्ता रोको

Next

दिंडोरी : प्रमुख सत्ताधारी असलेले भाजपा सरकार आपली मनमानी करत आमजनतेची फसवणूक करीत असून, कर्जमाफीबाबत शेतकºयांना आॅनलाइनच्या नावाखाली त्रास देत आहे. सद्या महागाईचा भडका उडाला असल्याने जनतेची मोठा भ्रमनिरास झाला आहे. महागाईविरोधात दिंडोरी येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दिंडोरीच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला जाऊ देणार नाही. यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी  सांगितले. नाशिक-कळवण रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करावे, शेतकºयाां त्वरित सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी केली.  रास्ता रोको आंदोलनात माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा परिषद गटनेते धनराज महाले, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, प्रवीण नाना जाधव, जिल्हा उपप्रमुख सुनील पाटील, पांडुरंग गणोरे, सभापती एकनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुरेश देशमुख, रमेश बोरस्ते, प्रभाकर जाधव यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. दिंडोरीचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दिंडोरी येथे शिवसेनेतर्फे सरकारच्या धोरणांमुळे वाढणाºया महागाईच्या निषेधार्थ रास्ता
रोको आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली. यावेळी भाऊलाल तांबडे, धनराज महाले उपस्थित होते. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार धनंजय लचके यांना देण्यात आले.

Web Title:  Stop the path against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.