शेतकºयांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:29 AM2018-06-07T00:29:59+5:302018-06-07T00:29:59+5:30
नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देशभरात शेतकºयांच्या सुमारे १३२ संघटनांनी एकत्र येऊन १ जूनपासून शेतमाल विक्रीवर बहिष्कार टाकून शेतकरी संप पुकारला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पगार यांच्या नेतृत्वाखाली नामपूरला बाजार समिती समोर रास्ता रोको करण्यात आले. याप्रसंगी पगार यांनी आपल्या भाषणातून सरकारवर टीका केली. सत्ताधारी भाजपा सरकार शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. खोट्या घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे. येत्या दोन दिवसात जर शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दीपक पगार यांनी यावेळी दिल. याप्रसंगी प्रहार संघटनेचे नाना भाऊ सावंत, रा. कॉँचे शशिकांत कोर, सम्राट काकडे, नितीन काकडे , बी. एस. भामरे, शेतकरी संघटनेचे प्रवीण अहिरे, पंढरीनाथ अहिरे, समीर सावंत, भिका धोंडगे, विनोद पाटील, हेमंत कोर, डोंगर पगार, सचिन कापडनीस यांनी तीव्र शब्दात शासनाचा निषेध व्यक्त केला. भाजपा वगळता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी संपास पाठिंबा दिला आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, दुधाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, नुकसानीचे पंचनामे झाल्यावर तत्काळ भरपाई मिळाली पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, चालू महिन्यात खरीप हंगामात पीककर्ज मिळाले पाहिजे, बँकांनी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक धिवरे, पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक विजय गावित , मंडल अधिकारी सी. पी. अहिरे यांना देण्यात आले. आंदोलन सुरु होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा व दंगानियंत्रण पथक नामपूर शहरात दाखल झाले होते. रास्ता रोकोमुळे सुमारे दोन तास मालेगाव-ताहाराबाद रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नामपूर परिसरातील शेतकºयांच्या भावनांचे निवेदन मिळाले असून, शासनस्तरावर लवकरच अहवाल पाठवून योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा.
- दीपक धिवरे
नायब तहसीलदार, सटाणा
पोलीस बंदोबस्तात दूध टॅँकर रवाना
लासलगाव : विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेल्याने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लासलगाव येथून पोलीस बंदोबस्तात दुधाचा टॅँकर रवाना करण्यात आला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात संकटात सापडलेल्या बळीराजाने विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील नागरिकांची रसद थांबविण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची कमतरता भासू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देऊ केल्याने त्याचा फायदा लासलगाव येथील एका दूध संकलन केंद्राच्या संचालकाने घेत पोलीस बंदोबस्तात वीस हजार लिटर दूध सुरत येथील डेअरीसाठी पाठवले. हे दूध डेअरीत पोहोचल्यानंतर पॅकिंग करून दूध मुंबईसाठी पाठविले जाणार आहे, अशी माहिती दूध संकलन केंद्राचे संचालक दत्ता क्षीरसागर यांनी दिली .