त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Published: May 30, 2017 12:17 AM2017-05-30T00:17:12+5:302017-05-30T00:17:21+5:30
त्र्यंबकेश्वर : कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी तुपादेवी फाट्यावर रास्ता रोको करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी तुपादेवी फाट्यावर रास्ता रोको करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची यामुळे कोंडी झाली होती.
यावेळी भरउन्हात शेकडो शेतकरी रस्त्यावर बसले होते. दोन्हीही बाजूने रस्ता अडवून धरल्याने वाहनांची कोंडी झाली होती. १ जूनपासून सर्व शेतकरी संपावर जात आहेत. शासनाला इशारा देण्यासाठी आजचा हा रास्ता रोको करण्यात आला. तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत तुपादेवी येथे दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. तसेच १ जूनपासून संपावर जाण्यासाठी शपथ घेतली.
यावेळी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह तालुक्यातील सर्वच नेत्यांनी किसान क्रांतीचा आजचा रास्ता रोको
केला, तसेच येत्या १ जूनपासूनचा
संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मागण्यांचे निवेदन त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शिवसेना शहर संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश चव्हाण, ग्राहक सेना अध्यक्ष शिवाजी कसबे, संतोष मिंदे, शांताराम पोरजे, श्रीराम कोठुळे, भाऊसाहेब कोठुळे, राजाराम चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते.