इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:31 PM2018-04-12T14:31:25+5:302018-04-12T14:31:25+5:30
मालेगाव : गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल व अन्य इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा तसेच कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुंबईआग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव येथील टेहरे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.
मालेगाव : गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल व अन्य इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा तसेच कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुंबईआग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव येथील टेहरे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा तसेच इंधनाचे दर कमी करावे अन्यथा जिल्ह्यात एकाच वेळी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भारती पवार, डॉ.सयाजी गायकवाड, यशवंत शिरसाठ, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, विजय रामजी पवार, विनोद चव्हाण, जिल्हा पदाधिकारी संदीप पवार, , जयंत पवार,अरु ण देवरे, आर.के.बच्छाव, अरु ण मेढे, सोमनाथ खातळे, संतोष गुप्ता, राजेंद्र सोनवणे, धर्मा भामरे, विनोद शेलार, जवानसिंग मोटकर, रतन हलवर आदींची भाषणे झाली.