पिंपळगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:53 PM2020-01-08T14:53:41+5:302020-01-08T14:53:48+5:30

पिंपळगाव बसवंत : देशातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कोकणगाव चौफुलीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

 Stop the Pimpalgavi farmers' road | पिंपळगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

पिंपळगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत : देशातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कोकणगाव चौफुलीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
पिंपळगाव बसवंत परिसरातील पालखेड येथील गावकऱ्यांनी कडकडीत बंद ठेवत कोकणगाव येथे स्वाभिमानी शेतकरीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली कोकणगाव चौफुलीवर मुंबई महामार्गावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात रस्ता रोको करून निषेध व्यक्त करत ओझर येथील मंडल अधिकारी तांबे व पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना निवेदन देण्यात आले.
शेतकºयांना सरसकट देशव्यापी कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा करा, शेतकºयांना पीकविम्याचे सर्वंकष संरक्षण द्या, सिंचन, दुष्काळ, पेन्शन, आरोग्य, पर्यावरण यासह सर्व मुद्द्यांचा विचार करून शेती क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष विकास व्हावा, यासाठी देशव्यापी धोरण स्वीकारा, या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता.
महाराष्ट्रात अकाली पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण खरीप हंगामातील पिके यामुळे नष्ट झाली. महाराष्ट्रातील शेतकºयांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात केंद्र सरकारने येथील शेतकर्यांना तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुधाकर मोगल साहेबराव मोरे निवृत्ती गारे भाऊसाहेब काटकर केशवराव मोरे बाळू मोरे जयराम मोरे संजय आरगडे अण्णा मोरे सुनील धनवटे संजय कट्यारे आधीच शेतकरी संघटने चे नेते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
------------------------------
महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते. तेव्हाही दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. तसेच ऊस व कांदा उत्पादक शेतकर्यांना सातत्याने बंधने लादून दर नाकारले. सध्याच्या सरकारने शेतकºयांचा सातबारा कोरा करू असे आश्वासने दिले होते पण त्यांनी देखीव तुटपंजी मदत देत शेतकºयांची खिल्ली उडवली.
-सोमनाथ बोराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना,
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष

Web Title:  Stop the Pimpalgavi farmers' road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक