वीजपुरवठा खंडित धाडसत्र योजना थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 06:36 PM2021-03-16T18:36:14+5:302021-03-16T18:36:42+5:30
पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी उपअभियंता विशाखा गायकवाड यांना दिले आहे.
पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी उपअभियंता विशाखा गायकवाड यांना दिले आहे.
सतत पाच ते सात वर्षांपासून अस्मानी, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून कोरोना सारख्या जनसंसर्ग रोगाने देशात थैमान घातले. या सर्व संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षाच्या संकटातून शेतकरी बाहेर येतोच नाही तर यावर्षी अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचे द्राक्ष, गहु, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यात महावितरण विभाग व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भवती वीजपुरवठा खंडित करत धाडसत्र सुरु केले आहे. विजबिले भरले नाहीतर रोहित्र, विद्युतपंप व लाईट कट करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
सरकाने शेतकऱ्यासाठी ५० टक्के बिले भरून संपूर्ण वीज बिल माफीची योजना सुरू केली आहे. मात्र त्या योजनेची अध्यपही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्रास सुरु असलेली धाडसत्र योजना त्वरित थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था झुगारुन महावितरणच्या विरोधात रस्त्यावर यावे लागेल, असे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
यावेळी देवेंद्र काजळे, कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ, मधुकर ताकाटे, रमेश गायकावाड, मनोज मोरे, निवृत्ती ताकाटे, गणपत जगताप, अशोक मेधणे, बाळासाहेब जाधव, जालिंदर बनकर, वैभव केणे आदी उपस्थित होते.
आसमानी संकटांनी व कोरोना वायरसमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे त्यात महावितरण विभाग व महाविकास आघाडी सरकारने जे धाडसत्र योजना सुरु केली आहे ती थांबवा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल म्हणुन शेतकऱ्याच्या गरजा व भावना लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा व कंपन्याकडुन १०० टक्के वसुली करा..
देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते.
शेतकऱ्यांना ८ तास वीज देयची आणि १०० टक्के वीजबिले वसुली करायची कंपन्यांना पुर्ण वेळ विज देयची आणि त्यांच्या थकबाकीबाबत सरकारने गप्प बसायचे आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायचा हे चुकीचे आहे.
- भाऊसाहेब शंखपाळ, चेअरमन, कादवा पाणी वापर संस्था, कारसूळ.
(१६ पिंपळगाव बसवंत)