वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:52+5:302021-03-23T04:15:52+5:30
वाढीव दिलेली वीज बिले कमी करा व ती बिले भरण्यासाठी शेतकऱ्याला वाढीव मुदत द्या, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा ...
वाढीव दिलेली वीज बिले कमी करा व ती बिले भरण्यासाठी शेतकऱ्याला वाढीव मुदत द्या, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा आणि वीज बिल भरण्यासाठी केल्या जात असलेल्या सक्तीचा शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होईल अशी भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संघटेनेचे अध्यक्ष करण गायकर युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, नाशिक जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, ज्ञानेश्वर थोरात, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी आदी उपस्थित होते.
===Photopath===
220321\22nsk_22_22032021_13.jpg
===Caption===
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देताना छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, आशिष हिरे, ज्ञानेश्वर थोरात, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी