ट्रक टर्मिनलसाठी राखीव भूखंडाच्या विक्री प्रक्रिया थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:14 AM2021-07-27T04:14:48+5:302021-07-27T04:14:48+5:30

नाशिक : अंबड एमआयडीसी येथील ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या वापरात बदल करून त्याचे विक्रीबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवून ...

Stop the process of selling the plot reserved for the truck terminal | ट्रक टर्मिनलसाठी राखीव भूखंडाच्या विक्री प्रक्रिया थांबवा

ट्रक टर्मिनलसाठी राखीव भूखंडाच्या विक्री प्रक्रिया थांबवा

Next

नाशिक : अंबड एमआयडीसी येथील ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या वापरात बदल करून त्याचे विक्रीबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवून हा भूखंड नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनला उपलब्ध करून द्या, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आयुक्त एमआयडीसी विभाग मुंबई, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदन दिले आहे.

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने महाविकास आघाडीच्या सत्ताधारी घटकपक्षांतील व विविध मंत्र्यांसह विरोधी पक्षांतील नेत्यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर, अंबड या दोन एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने असल्याचे नमूद करतानाच अंबड औद्योगिक वसाहतीत मंजूर विकास आराखडयात ट्रक टर्मिनलसाठी ५ एकर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. ही जागा सर्व सोयी-सुविधांसाठी पुरेशी आहे. यापेक्षा कमी असेल तर इतर सोयी-सुविधा करता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित होण्यासाठी संघटनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जागेत ट्रक टर्मिनल उभे रहावे, ही संघटनेची मागणी प्रलंबित असतानाच हा भूखंड परस्पर वापर बदल करून विक्री करण्याचा घाट एमआयडीसीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी घाटल्याचा आरोप करीत हा भूखंड विक्रीची प्रक्रिया थांबवून ते ट्रक टर्मिनलसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे. यावेळी प्रदीप पेशकार, सुभाष जंगडा, जयपाल शर्मा, विशाल पाठक, सुधाकर देशमुख, शंकर धनावडे, संजय राठी, महेंद्र सिंग राजपूत, दीपक ढिकले, दीपक पांडे, राजेश शर्मा, रतन पडवळ, विनोद कुमार आदी उपस्थित होते.

Web Title: Stop the process of selling the plot reserved for the truck terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.