सक्तीची कर्ज हप्ते वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:33+5:302021-03-18T04:14:33+5:30
शहरात नागरिक, वाहनधारक, स्कूल व्हॅन चालकांनी बँक आणि खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. गेल्यावर्षी कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांचे ...
शहरात नागरिक, वाहनधारक, स्कूल व्हॅन चालकांनी बँक आणि खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. गेल्यावर्षी कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांचे रोजगार, नोकऱ्या गेल्या. शाळा बंदमुळे स्कूल व्हॅन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते भरण्यास पैसे नसल्याने अशोकनगर येथे व्हॅन चालक तुकाराम गांगुर्डे यांनी आत्महत्या केली आहे. बँकांनी वाहन हप्ते वसुली थांबवावी, रिक्षा, टॅक्सी, टेम्पोच्या दर वर्षीच्या इन्शुरन्स विमा रकमेत सवलत देणे, गतवर्षी रिक्षा, टॅक्सी, टेम्पो धारकांनी काढलेल्या वाहन विमा मुदत १ वर्षभर वाढविणे, रिक्षा टॅक्सी धारक यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर समिती गठित करत समितीत वाहतूक संघटना प्रतिनिधींचा समावेश करावा. गांगुर्डे यांच्या कुटुंबीयांना मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, भगवान पाठक, सागर देशमुख, राजेंद्र वागले, किरण डहाळे, कैलास बारवकर, पुरुषोत्तम पाथरे, आदींसह श्रमिक सेना पदाधिकारी उपस्थित होते.