बोरगावी शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:08 PM2018-10-15T13:08:17+5:302018-10-15T13:08:29+5:30

बोरगांव : विज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव यूवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे सापूतारा वणी मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन्हीबाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती.

Stop the road by Borgagy farmers | बोरगावी शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको

बोरगावी शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको

Next

बोरगांव : विज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव यूवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे सापूतारा वणी मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन्हीबाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. आंदोलनात मोठ्या संख्येने यूवा कार्यकर्ते सकाळी जमा होऊन विविध प्रकारच्या घोषना देत रास्ता रोकोला सुरूवात झाली. यात महिलांनी आपला सहभाग नोंदवला. परतीच्या पावसाने दडी मारल्याने मात्र वरच्या पाण्यावरती येणारी शेती ४० ते ५० टक्के करपली आह. उर्वरित शेती वाचविण्यासाठी शेतकरी वर्ग धडपड करीत असतांना तालूक्यातील महावितरण कंपनीने वीज पूरवठा वारंवार खंडीत होने, वाढते भारनियमन यामुळे शेतकरी बांधव वैतागला आहे. या सर्व व्यथा समितीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी वाजे यांच्यासमोर मांडल्या. त्याचे दोन दिवसांत समस्या सोडवू असे लेखी अश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात दादाराव पवार ,काशीनाथ भोये, अशोक गवळी, नामदेवराव भोये, सूमन भोये,लक्ष्मण बागूल,भास्कर भोये,हेमंत चव्हान व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक खरे, माने, हवालदार गोतूर्णे,गांगूर्डे,गवळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Stop the road by Borgagy farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक