कांदाप्रश्नी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:19 PM2019-03-02T14:19:50+5:302019-03-02T14:21:07+5:30
विंचूर : कांद्याला हमीभाव द्यावा, द्राक्ष पिकाचा विम्यात समावेश करावा, सरसकट कर्जमाफी, शेतक-यांना वीजबील माफी द्यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे विंचूर चौफुलीवर शनिवारी सकाळी १० वाजता सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
विंचूर : कांद्याला हमीभाव द्यावा, द्राक्ष पिकाचा विम्यात समावेश करावा, सरसकट कर्जमाफी, शेतक-यांना वीजबील माफी द्यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे विंचूर चौफुलीवर शनिवारी सकाळी १० वाजता सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर कांदे फेकत निषेध करण्यात आला. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुक काहीकाळ ठप्प झाली होती.
येथील तीनपाटीवर कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले. सध्या शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून कांदा पिकाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून, कांद्याला हमीभाव द्यावा यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शेतक-यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. कांद्याला ५० ते १०० रु पये एवढी कवडीमोल किंमत मिळत असून त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. सरकारने त्वरित शेतमालाला हमीभाव द्यावा व संपूर्ण कर्जमाफी करून शेतकर्याचा सात बारा कोरा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली. दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी हतबल झाला असून खोटी आश्वासने देवून गेली पाच वर्ष भाजप ङ्क्त शिवसेना युती सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना रडवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शेतकरी बांधव भाजप शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही रविंद्र पगार यांनी दिला. यावेळी माजी आमदार धनराज महाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय बनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरु ण मेढे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, निफाड तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नगरसेवक देवदत्त कापसे, युवक अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र भवर, बबनराव शिंदे, पंचायत समतिीचे माजी सभापती प्रकाश वाघ, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल सालगुडे, शहराध्यक्ष मनोज धारराव, सचिन होळकर, रोहित धवण, सचिन दरेकर, पंचायत समिति सदस्य सुरेखा नागरे आदींची भाषणे झाली.