विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:36 PM2017-08-24T23:36:39+5:302017-08-25T00:04:31+5:30
सायखेडा : शिंपी टाकळी, दारणासांगवी, तळेगाव वाट, चितेगाव फाटा, वºहेदारणा, लालपाडी, चांदोरी शिवार या भागातून चांदोरी, सायखेडा येथे महाविद्यालयात येणाºया-जाणाºया शेकडो विद्यार्थ्यांची बसअभावी गैरसोय होत असल्याने चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रस्ता रोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे विद्यार्थी अधिकच संतप्त झाले.
सायखेडा, चांदोरी या ठिकाणी असलेल्या शाळा, महाविद्यालयात जाणाºया-येणाºया विद्यार्थ्यांसाठी या मार्गावर बस थांबे असून, बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अनेकवेळा विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष तसेच पालक यांनी निवेदन दिले आहे, मात्र फक्त आश्वासने मिळत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले. महाविद्यालयाची वेळ सकाळी लवकर असून, बस थांबत नसल्याने उशीर होतो, पालक आपल्या मुलांना दररोज शाळेत सोडवू शकत नसल्याने अनेकदा घरी रहावे लागते. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि ग्रामस्थाच्या वतीने शिंपी टाकळी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नाशिक तसेच येवला, लासलगावकडून येणºया बसेस थांबत नसल्याने महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून तसेच विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन बस फेºया वाढवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या ठिकाणी सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आंबदास मोरे, तहसीलदार विनोद भामरे यांनी भेट देत संबंधिताशी मोबाइलवरून संपर्क केला. तसेच बसफेºया वाढवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चांदोरीचे तानाजी चारोस्कर, संदीप टर्ले, संदीप गडाख, संजय शिंदे, पुंडलिक टर्ले, संजय टर्ले, किरण गुंजाळ, नवनाथ नाठे, भगवान गोराडे, विजय शिंदे आदी विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.