आदिवासी मोर्चेकऱ्यांचा अचानक रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:44 AM2019-02-15T01:44:54+5:302019-02-15T01:45:11+5:30
आदिवासी विकास विभागाच्या विशेष बाब भरती प्रक्रियेत आदिवासी आश्रमशाळांवर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ आदिवासी विकास कार्यालयावर निघालेल्या बिºहाड मोर्चेकºयांनी दुपारच्या सुमारास ओझर येथे अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या विशेष बाब भरती प्रक्रियेत आदिवासी आश्रमशाळांवर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ आदिवासी विकास कार्यालयावर निघालेल्या बिºहाड मोर्चेकºयांनी दुपारच्या सुमारास ओझर येथे अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सोग्रस फाटा येथून गेल्या ११ तारखेपासून मोर्चेकरी नाशिकच्या दिशेने निघाले असून, या मोर्चाची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मोर्चेकºयांनी दुपारच्या सुमारास ओझर येथे येताच अचानक रास्ता रोको आंदोलन केले. ठिकठिकाणी मोर्चेकरी रस्त्यातच ठाण मांडून बसल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. मोर्चेकºयांना समजविण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. सुमारे पाउण तास हा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि समांतर रस्त्याने मोर्चेकरी मार्गस्थ झाले. सध्या मोर्चेकरी ओझर येथेच मुक्कामी असून, शुक्रवारी आंदोलनकर्ते नाशिकच्या दिशेने निघणार आहेत. जसजसा मोर्चा पुढे पुढे जात आहे तसतशी मोर्चेकºयांची संख्या वाढत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी सांगितले. राज्यातील विविध भागातून आलेले सुमारे अडीच हजार कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले आहेत. गेल्या ११ तारखेपासून चांदवड येथील सोग्रस फाट्यापासून मोर्चाला सुरुवात झाली असून, मोर्चेकरी नाशिक शहराच्या दिशेने निघाले आहेत. मोर्चा १७ तारखेला आदिवासी आयुक्तालयावर धडकणार आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाºया आश्रमशाळा व वसतिगृह यामध्ये अनेक वर्षांपासून रोजंदारीवर कर्मचारी काम करीत आहेत. या कामगारांकडे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असतानाही रोजंदारी कर्मचाºयांना आदिवासी विभागाच्या विशेष भरतीत स्थान देण्यात न आल्याने कर्मचाºयांनी आंदोलन पुकारले आहे.