उपकेंद्राची जागा हस्तांतरण प्रक्रिया थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:27 AM2020-01-04T00:27:34+5:302020-01-04T00:49:37+5:30

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या वापरातील एकूण सव्वासात हजार चौरस फूट जागे पैकी ३ हजार चौरस फूट ...

Stop the transfer of the epicenter | उपकेंद्राची जागा हस्तांतरण प्रक्रिया थांबवा

उपकेंद्राची जागा हस्तांतरण प्रक्रिया थांबवा

Next
ठळक मुद्देपुणे विद्यापीठ उपकेंद्र प्रकरणी मनपाला पत्र : प्रक्रियेला स्थगितीसाठी पत्रव्यवहाराची नामुष्की

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या वापरातील एकूण सव्वासात हजार चौरस फूट जागे पैकी ३ हजार चौरस फूट क्षेत्र हे महापालिकेस परत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु. या निर्णयानंतर व्यावस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांसह पुणे विद्यापीठीय महाविद्यालयीन शिक्षक संघटना (पुक्टो)संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने ही जागा हस्तांतरण प्रक्रिया थांबविण्यासाठी महापालिकेला पुन्हा पत्रव्यवहार करण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढावली आहे.
विद्यापीठ उपकेंद्राची तीन हजार चौरस फुटाची जागा महापालिकेला परत करण्या निर्णय विद्यापीठ प्रशासनाने सिनेटला अंधारात घेतल्याचा आरोप करीत व्यावस्थापन परिषदेचे सदस्य विजय सोनवणे व अधिसभा सदस्य डॉ. नंदू पवार यांच्यासह पुणे विद्यापीठीय महाविद्यालयीन शिक्षक संघटना (पुक्टो)यांनी गुरुवारी उपकेंद्र समन्वयकांना दिलेल्या निवेदनातून केला होता.
तसेच उपकें द्राच्या ताब्यात असलेली जागा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असून ती परत करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर उपकेंद्र समन्वयकांनी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे जागा हस्तांतरण प्रक्रिया पुढील पत्रव्यवहारापर्यंत स्थगित करण्याची विनंती केली असून, यापूर्वी हस्तांतरणासाठी पाठविलेले पत्र रद्द करण्याची विनंती या पत्रद्वारे केली आहे.
विद्यापीठाच्या मार्गदर्शनानंतर कार्यवाही
विद्यापीठाचे उपकेद्रासाठी ३० गाळे विद्यापीठाने वापरासाठी परवाना तत्त्वावर घेतले आहेत. यातील सुमारे ३ हजार चौरस फूटाचे गाळे महापालिकेस परत करण्यात यावेत, असा प्रस्ताव गत महिन्यात नाशिक उपकेंद्रातर्फे पाठविण्यात आला होता. यावर निर्णय होऊन फेब्रुवारीपासून ही जागा उपकेंद्राच्या एकूण जागेतून वजा करण्यासाठी विद्यापीठाने अधिसभेच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करताना मंजुरी दिल्याने या निर्णयाच्या विरोधात व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्यांसह पुक्टो संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने उपके ंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांनी महापालिकेला हस्तांतरण प्रक्रिया थांबविण्यासाठी पत्र लिहितांनाच या प्र्रकरणात मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठालाही पत्र व्यावहार केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मार्गदर्शनानंतरच जाहा हस्तांतरणाची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

Web Title: Stop the transfer of the epicenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.