बोरगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:05 AM2018-10-16T00:05:17+5:302018-10-16T00:06:56+5:30
बोरगाव/सुरगाणा : वीज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव युवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे वणी-सापुतारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

आंदोलनात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा देत वाहतूक अडवून धरली. महिलांनीही सहभाग नोंदवला. समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध समस्या महावितरण कंपनीचे अधिकारी वाजे यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी दोन दिवसांत समस्या सोडवू, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात दादाराव पवार, काशीनाथ भोये, अशोक गवळी, नामदेवराव भोये, सुमन भोये, लक्ष्मण बागुल, भास्कर भोये, हेमंत चव्हाण व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक खरे, माने, गोतुर्णे, गांगुर्डे, गवळी यांनी बंदोबस्त ठेवला. परतीच्या पावसाने दडी मारल्याने पावसाच्या भरवशावरील शेतीतील ४० ते ५० टक्के पिके करपली आहेत. उर्वरित पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत असताना तालुक्यातील महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे, वाढते भारनियमनामुळे शेतकरी वैतागले आहेत.