पेन्शनवाढीच्या मागणीसाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:43 AM2018-11-14T00:43:02+5:302018-11-14T00:43:40+5:30
सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मनमाड : सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ईपीएस ९५ अंतर्गत केंद्र सरकारने लागू केलेली अंशदायी पेन्शन ही निवृत्तांना जीवन जगण्यास पुरेशी नाही. १८६ उद्योगांतील कामगारांना
अत्यल्प प्रमाणात पेन्शन मिळते. सेवानिवृत्तांना कोशीयारी कमिटीच्या शिफारशीनुसार तीन हजार रुपये महागाई भत्ता लागू करावा, नऊ हजार रुपये पेन्शन
अधिक महागाई भत्ता देण्यात यावा, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हायर सॅलरी पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी मनमाड-शिर्डी मार्गावर पाकिजा कॉर्नर जवळ रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सुधाकर गुजराथी, कॉ. राजू देसले, डी.बी. जोशी, प्रकाश नाइक, उपाध्यक्ष बापू रांगणेकर, शिवाजी ढोबळे, नरेंद्र कांबळे, श्रीकांत साळसकर, तालुकाध्यक्ष सुरेश वाघ, दिलीप अव्हाड, अशोक व्यवहारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.