निफाडला शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:38 AM2018-06-09T01:38:11+5:302018-06-09T01:38:11+5:30
निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला तसेच निफाड शहर दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. सध्या शेतकºयांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला तसेच निफाड शहर दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.
सध्या शेतकºयांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी भाजपाला हिंदूंचे राज्य आणून जातीयवाद जन्माला घालायचा असल्याचा आरोप करून आमच्या सरकारच्या काळात उसाला २३०० रुपये भाव होता तो आज १६०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असून, शेतकºयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर केले.
यावेळी अनिल कुंदे, लासलगाव बाजार समिती संचालक सुभाष कराड, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, भीमराज काळे यांनीही आपल्या मनोगतातून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. याप्रसंगी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, या निवेदनात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांचा शेतकरीविरोधी प्रतिक्रियेवर कारवाई करावी, शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, डिझेलवर अनुदान मिळावे, बिबट्यांचा बंदोबस्त करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतमालाला उत्पादनावर आधारित हमीभाव मिळावा आदी मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात राजेंद्र बोरगुडे, नगरसेवक
देवदत्त कापसे, वाल्मीक कापसे, बापूसाहेब कुंदे, जानकीराम धारराव, नंदू कापसे, कृष्णा नागरे, सहभागी झाले होते.
४सकाळी १० वा शांतीनगर चौफुली येथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकरी जमा झाले. लिलावासाठी आणलेले कांदे रस्त्यावर ओतले. नाशिक व येवला मार्गावर कांद्याचे ट्रॅक्टर, बैलगाडी आडवी लावण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे नाशिक, औरंगाबाद, पिंपळगाव बसवंतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १२ वाजेपर्यंत बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र निफाड बंदमुळे सकाळी आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीला आणला नाही. व्यापाºयांनी दुकाने लावली नाहीत आंदोलन मागे घेतल्यानंतर दुपारी१२ नंतर आठवडे बाजार भरवण्यात आला.