शेतकऱ्यांचा कळवणला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:18 PM2019-01-24T18:18:23+5:302019-01-24T18:19:51+5:30

ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या नावाखाली लोकप्रतिनिधीनी निवडणुकांच्या तोंडावर राजकारण न करता प्रकल्पाचे काम मार्गी लावावे या मागणीसाठी ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, दहयाणे परिसरातील शेतकरी बांधवांनी बस स्थानकासमोर मेनरोडवर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

Stop the way to the farmers' rapprochement | शेतकऱ्यांचा कळवणला रास्ता रोको

ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलनप्रसंगी शेतकरी बांधव व मार्गदर्शन करतांना शेतकरी नेते देवा भुजाडे.

Next
ठळक मुद्देगेल्या ४१ वर्षापासून ओतूरच्या पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे

कळवण : ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या नावाखाली लोकप्रतिनिधीनी निवडणुकांच्या तोंडावर राजकारण न करता प्रकल्पाचे काम मार्गी लावावे या मागणीसाठी ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, दहयाणे परिसरातील शेतकरी बांधवांनी बस स्थानकासमोर मेनरोडवर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
ओतूरचे देवा भुजाडे, अशोक मोरे, दिगंबर पवार, शब्बाण पठाण, अतुल देवरे, बाळासाहेब देशमुख, ललित मोरे, भाऊसाहेब मोरे, भगवान मोरे, स्वप्निल देवरे, बाबा शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डॉ. तृप्ते यांना निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना ओतूर प्रकल्प संदर्भातील मागणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन पाठवून भावना कळवू असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
ओतूर धरण हाच आमचा पक्ष असल्याचा जयघोष करत लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सकाळी दहा वाजता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. सरकारच्या व मंत्र्याच्या घोषणावर आमच्या शेतकºयांना आता भरवशा नसून वेळप्रसंगी लोकसभेच्या मतदानावर ओतूर परिसरातील शेतकरी बहिष्कार टाकतील असा इशारा देऊन या विषयाकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
गेल्या ४१ वर्षापासून ओतूरच्या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या गळतीच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत असून कोणत्या अन कोणत्या कारणामुळे ओतूर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यातील अंसतोषाला वाट मोकळी करून दिली.
रास्ता रोको आंदोलनात राजेंद्र भामरे, संदीप वाघ, प्रदीप पगार, भाऊसाहेब मोरे, पर्वत मोरे, दिपक अहेर, उत्तम पवार, नागेश मोरे, सुभाष देवरे, रफीक पठाण, राजू देशपांडे, पंकज मेणे, मोसीन पठाण, समाधान देवरे, अतुल देवरे, गोकुळ देवरे, शाबान पठाण, मंगेश देसाई, भाऊसाहेब मोरे, अशोक मोरे, युवराज मोरे, बाळासाहेब देशमुख, धना देवरे, भास्कर देशमुख, मोसीन पठाण, शांताराम मोरे, विजय गायकवाड, संजय काळे, संदीप देवरे, मुकेश आहेर, योगेश पगार, भूषण देवरे, वैभव देवरे, अशोक मोरे, तन्मय दशपुते, मुकुंद देवरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
ओतूर परिसरात पाणी टंचाई
ओतूर खोºयातील गावांचा वाड्यांचा आणि वस्तीचा पाणीप्रश्न सोडविणारा ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या प्रकल्पातून पाणी गळती होते, त्यामुळे हिवाळ्यातच कोरडाठाक पडतो. ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्प तिन्ही बाजुंनी डोंगरमाथ्यांच्या पायथ्याशी आहे. पावसाळ्यात जोराच्या पहिल्या पावसातच हा लघुपाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरतो. तर संपूर्ण उर्वरित पावसाळ्यात यातील पाणी पुढे जाते. परंतु हे सर्व पाणी भराव व सांडव्याच्या खालून पडलेल्या घळीतून वाहून जाते. आणि हिवाळ्याच्या अखेरपर्यंत यातील सर्व पाणी संपून जाते. अनेक शेतकºयांनी लघुपाटबंधारे प्रकल्पात विद्युतपंप टाकूण पाणी पळवत असल्याने पाणी लवकर संपण्यास मदत होते. हिवाळ्यातच प्रकल्प कोरडेठाक पडतो यावर अवलंबून असलेले या भागातील विहिरी, विंधन विहिरी असे जलस्त्रोतांचे पाणी कमी पडण्यास सुरूवात होते. याचा फटका पाण्याची टंचाई असलेल्या ओतूरसह नरूळ, कन्हेरवाडी, कुंडाणे, दह्याणे, मेहदर या गावांना सहन करावा लागत आहे.

Web Title: Stop the way to the farmers' rapprochement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.