आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नाशकात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:32 PM2018-08-27T16:32:04+5:302018-08-27T16:37:08+5:30

मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी नशिक जिल्हा मुस्लिम विकास अरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी शहरातील द्वारका चौकात रास्तारोको आंदोलनक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Stop the way for the Muslim reservation | आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नाशकात रास्ता रोको

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नाशकात रास्ता रोको

Next
ठळक मुद्देमुस्लीम समाजाचा नाशकात रास्ता रोकोमुस्लिम समाजाला 10 टक्के आरक्षण मिळण्याची मागणी

नाशिक :मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी नशिक जिल्हा मुस्लिम विकास आरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी (दि.२७)शहरातील द्वारका चौकात रास्तारोको आंदोलनक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुस्लीम समाजाला रंगनाथ मिश्रा  आयोग, सच्चर समिती, डॉ. महेमुद्दल आयोगाच्या अहवालावर अधारीत आरक्षण, शिक्षण व संरक्षण मिळावे या मागणीसाठी व मुस्लीम समाजाची समाजाची अवस्था सर्वच क्षेत्रात मागासलेली असतानाही शासन स्तरावर मुस्लीम  समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप करीत मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीने द्वारका चौकात जवळपास १५ ते २० मिनिटे रास्तारोको केला. त्यामुळे परिसरात वाहतूक क ोंडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मुस्लीम समाजाच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवून जिल्हाधिकाऱ्यांना समाजाच्या मागण्यांविषयी निवेदन दिले. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला १६ टक्के  व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा आदेश झालेला होता. परंतु भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मुस्लीम समाजाचे आरक्षण जातीय द्वेशाने रद्द केल्याचा आरोप या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. सरकारने गेल्या चार वर्षापासून मुस्लीम आरक्षणाविषयी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे समाज शिक्षण व नोकऱ्यांपासाून वंचीत राहिलेला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला १० टक्के आरक्षण मिळावे अशी मागणीही या निवदनातून करण्यात आली आहे. यावेळी  शेख हनिफ बशीर, जावेद पठाण, विशाल वारुळे,नदीम शेख,  दाऊद शेख,  शेरू मोमीण,      जावेद इब्राहिम, रुबिना खान,  इसाक कुरेशी, नजीर मौला आदि उपस्थित होते. 

Web Title: Stop the way for the Muslim reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.