नामपूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:53 AM2018-07-18T00:53:22+5:302018-07-18T00:55:48+5:30

नामपूर : येथील बाजार समितीत मागील वर्षापासून शेतकºयांचे थकलेले पैसे तत्काळ मिळावेत तसेच दुधाला हमीभाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या गेटसमोर संतप्त शेतकºयांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 Stop the way for Nampura farmers | नामपूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नामपूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देथकीत पैशांमुळे आंदोलन कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नामपूर : येथील बाजार समितीत मागील वर्षापासून शेतकºयांचे थकलेले पैसे तत्काळ मिळावेत तसेच दुधाला हमीभाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या गेटसमोर संतप्त शेतकºयांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सटाणा बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूरला स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आली. यात शासन नियुक्त प्रशासक मंडळ निर्माण झाले. या काळात सटाणा येथील रहिवासी शगुणा अकील शेख, अखलाख रफीक शेख, अकील रफीक शेख या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना बाजार समितीने कांदा खरेदीचा परवाना दिला होता. या व्यापाºयांनी २१५ शेतकºयांचे ४८ लाख रु पये गत वर्षापासून थकवले आहेत. याबाबत शेतकºयांनी अनेकदा बाजार समितीकडे चकरा मारल्या मात्र बाजार समितीकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने हा रास्ता रोको केला. नामपूर बाजार समितीच्या मागील प्रशासकीय मंडळाने शेतकºयांचे पैसे बुडवणाºया व्यापाºयाला हाताशी धरल्यामुळेच आज बाजार समितीला व शेतकºयांना बुरे दिन आले असून, दोषी संचालकांवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रि या स्वाभिमानी संघटनेचे संघटक प्रवीण अहिरे यांनी व्यक्त केली. शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांना दुधाचा टॅँकर अडवताना अटक झाल्यामुळे यावेळी भाजपा शासनाचा निषेधही करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब भामरे, उपसभापती लक्ष्मण पवार, भाऊसाहेब अहिरे, आनंदा मोरे यांच्यासह संचालकांनी मालेगावचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन व्यापारी शेख यांना तत्काळ अटक करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब भामरे यांनी या घटनेत राजकारण न करता शेतकºयांचे थकीत पैसे मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. या रास्ता रोको आंदोलनामुळे मालेगाव ताहाराबाद रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलीस अधिकारी सतीश गावित, श्रीराम कोळी, नायब तहसीलदार एन.के. चव्हाण, मंडळ अधिकारी सी. पी. अहिरे, पोलीसपाटील बाजीराव सावंत, सचिव संतोष गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या आंदोलनानंतर शेतकºयांचे पैसे मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:  Stop the way for Nampura farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.