इंधन दरवाढीविरोधात सिन्नरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:37 PM2018-04-06T14:37:14+5:302018-04-06T14:37:14+5:30

सिन्नर : पेट्रोल, डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the way of the Nationalist Congress Party against the fuel hike | इंधन दरवाढीविरोधात सिन्नरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रास्ता रोको

इंधन दरवाढीविरोधात सिन्नरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रास्ता रोको

Next

सिन्नर : पेट्रोल, डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. इंधनाचे दर कमी करण्यासाठी भाजपा शिवसेना युती सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्टÑवादी कॉँगेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केली. यावेळी प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, डॉ.भारती पवार, विष्णुपंत म्हैसधुणे, जिल्हा परिषदेचे सभापती यतीन पगार, सदस्य डॉ.सयाजी गायकवाड, नितीन पवार, यशवंत शिरसाठ, व्ही.एन.नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रविंद्र काकड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, निवृत्ती अरिंगळे, जयराम शिंदे, योगेश निसाळ, बाळासाहेब म्हस्के, दतात्रय माळोदे, विलास सानप आदींची भाषणे झाली. पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. तरी देखीलसरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी टीव्हीवर येऊन ‘‘बोहत हो गयी मेहंगाई कि मार’’ अस म्हणणाऱ्यात्या काकू आता पेट्रोलचे दर ८० रु पयांच्या पुढे गेले तरी अद्याप का दिसत नाहीत असा सवाल देखील रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केला. पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते डी.डी.गोर्डे, डॉ.विष्णू अत्रे, नामदेव कोतवाल, अर्जुन बर्डे, सायरा शेख, मेघा दराडे, निर्मला रेवगडे, संध्या भगत, अफरीन सय्यद, मीरा वाघमारे, युनुस शेख, राजेंद्र भगत, दौलत त्रिभुवन, संदीप लोखंडे, राजेंद्र माळी, सुदाम शिरसाठ, रतन तुपे, वामन पवार, रमेश देशमुख, भगीरथ रेवगडे, जयप्रकाश गायकवाड, राजेंद्र सोनवणे, शुभम भारसाकळ, राजाभाऊ उगले, वाळीबा उगले, प्रफुल्ल पाटील, कपिल भावले, समर सोनार, संदीप आवारे, मधुकर कणसे, राहुल मोकळे, राजेंद्र उगले, प्रवीण चव्हाण, स्वप्नील कुटे, रविंद्र धुर्जड, गोकुळ कांडेकर, रोहित कटाळे, मिहंद्र कासार, सचिन टिळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Stop the way of the Nationalist Congress Party against the fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक