टेहर येथे कांदा उत्पादकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:03 PM2018-12-01T14:03:40+5:302018-12-01T14:03:51+5:30
मालेगाव : कांद्याला हमी भाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी व शासनाच्या कांदा विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कसमादे शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतक-यांनी मुंडण करीत तालुक्यातील टेहरे येथील हुतात्मा चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
मालेगाव : कांद्याला हमी भाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी व शासनाच्या कांदा विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कसमादे शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतक-यांनी मुंडण करीत तालुक्यातील टेहरे येथील हुतात्मा चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धातास खोळंबली होती.गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कोसळले आहेत. अल्पदरात कांदा खरेदी केला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी कृती समितीच्या पदाधिका-यांनी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती. शनिवारी तालुक्यातील टेहरे येथील हुतात्मा स्मारका जवळ सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. कांद्याला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, कांद्याचे निर्यात धोरण निश्चित करावे, जनावरांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, निर्यातबंदी उठवावी यासह विविध मागण्यांप्रश्नी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. शासनाच्या कांदा विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शेतकºयांनी महामार्गावरच मुंडण केले. यावेळी कृती समितीचे अॅड. महेश पवार, डॉ. तुषार शेवाळे आदींसह कांदा उत्पादक शेतकºयांनी भाषणे केली.या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर संतप्त शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रांताधिकारी मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात कसमादे शेतकरी कृती समितीचे अॅड. पवार, जयेश अहिरे, अभिषेक पगार, अक्षय पवार, वैभव हिरे, आकाश भामरे, गणेश बच्छाव, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, टेहरेचे माजी सरपंच प्रभाकर शेवाळे, कृउबाचे माजी संचालक संदीप शेवाळे, पंचायत समितीचे सदस्य अरुण पाटील, मामकोचे संचालक राजेंद्र भोसले, दशरथ निकम, अॅड. चंद्रशेखर शेवाळे, अनिल शेवाळे, विनोद शेलार, अॅड. आर. के. बच्छाव, डॉ. जयंत पवार, कॉँग्रेसचे शांताराम लाठर, तालुकाध्यक्ष संदीप पवार, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, टेहरेचे माजी उपसरपंच अनिल शेवाळे, प्रा. के. एन. अहिरे, सुधीर चव्हाण, निखिल पवार, देवा पाटील, युवक कॉँग्रेसचे संदीप निकम, जयेश अहिरे, सचिन बेडसे आदिंसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.