शेतमजूर संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:00 AM2018-02-08T01:00:59+5:302018-02-08T01:03:11+5:30
देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटना नाशिक संलग्न चांदवड-देवळा संयुक्त समितीच्या वतीने आदिवासी व बिगरआदिवासी वनजमीन अतिक्रमणधारक व ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी सरचिटणीस भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचकंदिल येथे विंचूर -प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी हिरे यांना निवेदन देण्यात आले.

वनजमिनी कसणाºयांच्या नावे करावी, पिढ्यानपिढ्या आदिवासी, बिगरआदिवासी व अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्यांची नोंद करून कायम करावी व नियमानुसार घरपट्टी लागू करावी, वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा, घटस्फोटित महिला याना नियमित पेन्शन व अर्थसहाय्य द्यावे, गरीब गरजूंना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा, आदिवासींना कॅम्प लावून जातीचे दाखले वितरण करण्यात यावेत व उमाजी नाईक व तंट्या भिल यांची स्मारके उभारण्यात यावीत या व इतर मागण्यांसाठी मार्केट यार्ड ते पाचकंदीलपर्यंत मोर्चा काढून विंचूर -प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मंडळ अधिकारी हिरे यांनी शासनापर्यंत मागणी पोहचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब बागुल, प्रकाश चौधरी, कडू शिवमन कुवर, भाऊसाहेब माळी, गंगाराम जाधव यांसह कार्यकर्ते हजर होते. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.