मुद्रांक विक्रेत्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:30 PM2017-10-09T23:30:03+5:302017-10-09T23:30:08+5:30

नांदगाव : आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या राज्यव्यापी बेमुदत बंदमध्ये तालुक्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रे ते व दस्तलेखक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सोमवारी सकाळपासूनच बंदची झळ जाणवायला लागली. शासकीय कामकाजासाठी लागणाºया दस्तलेखन कामासाठी आलेल्या जनतेची या संपामुळे मोठी गैरसोय झाली. त्याचा परिणाम शासकीय कोशागार व दुय्यम निबंधक कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर दिसून आला. संपात तालुक्यातील मनमाड व नांदगाव येथील शासनमान्य मुद्रांक विके्र ते व दस्तलेखक सहभागी झाले आहेत.

Stop the work of stamp vendors | मुद्रांक विक्रेत्यांचे काम बंद

मुद्रांक विक्रेत्यांचे काम बंद

Next


नांदगावी मुद्रांक विक्रे ता संघटनेच्या वतीने दुय्यम निबंधक आर. के. पोटले यांना निवेदन देताना मनोज गांगुर्डे, चंद्रकांत मोकळ, दीपक जाधव, साईनाथ आर्णे, गोविंदराव पैठणकर आदी़

 

नांदगाव : आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या राज्यव्यापी बेमुदत बंदमध्ये तालुक्यातील शासनमान्य मुद्रांक विक्रे ते व दस्तलेखक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सोमवारी सकाळपासूनच बंदची झळ जाणवायला लागली. शासकीय कामकाजासाठी लागणाºया दस्तलेखन कामासाठी आलेल्या जनतेची या संपामुळे मोठी गैरसोय झाली. त्याचा परिणाम शासकीय कोशागार व दुय्यम निबंधक कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर दिसून आला. संपात तालुक्यातील मनमाड व नांदगाव येथील शासनमान्य मुद्रांक विके्र ते व दस्तलेखक सहभागी झाले आहेत. प्रचलित छापील मुद्रांक व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे, ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांमार्फत राबवावी, एएसपी प्रणाली अधिकृत दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांना मिळावी, ई-चलन व्यवस्था कायम ठेवून त्यांच्या वारसांना परवाना हक्क मिळावा अशा विविध मागण्यांचे निवेदन संपकर्त्यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी व दुय्यम निबंधक आर. के. पोटले यांना सादर करण्यात आले.
निवेदनावर मनोज गांगुर्डे, चंद्रकांत मोकळ, संजय कटारे, पी. आर. निळे, वसंतकुमार डोंगरे, बाळासाहेब महाजन, मुश्ताक पठाण, राजेंद्र बोरसे, दीपक जाधव, जी. ई. पैठणकर, आर. व्ही. खैरनार, आर. यू. शेवाळे, एस. आर. गांगुर्डे, साईनाथ आर्णे यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Stop the work of stamp vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.