शिक्षक मिळाल्याने आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:43 PM2018-09-30T17:43:54+5:302018-09-30T17:44:29+5:30
ममदापुर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. छावा सघंटनेने शिक्षकाच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

येवला तालुक्यातील ममदापुर येथील जिल्हा परिषद शाळेला ४ शिक्षकांचे काम २ शिक्षक करत होते. छावा सघंटनेचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष देवीदास गुडघे यांनी महिन्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याची दखल प्रशासनाने घेतली शनिवारी सकाळी ७ वाजता नविन शिक्षक प्रविण काकडे हे हजर होते. याची माहिती पंचायत समिती सभापती नम्रता जगताप व उपसभापती रूपचंद भागवत यांनी गुडघे यांना फोनवरून दिली. शाळेला शिक्षक दिला नाही तर पंचायत समितीमध्ये शाळा भरवू असा इशारा गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला होता. पण शिक्षक दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. नविन शिक्षक आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी देखिळ समाधान व्यक्त केले आहे.