साठवण बंधारा फुटल्याने पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:26 AM2018-12-09T01:26:22+5:302018-12-09T01:26:27+5:30
घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे.
घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे.
माणिकखांब - दौंडत भागातल्या पाणीटंचाईवर सिमेंट बंधाऱ्यामुळे मात करण्यात आली होती. दोनही गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. असे असूनही अनेक वर्षांपासून या बंधाºयाच्या डागडुजीसाठी कोणताही प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात आलेला नसल्याचे माणिकखांबचे सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. सिमेंटचे बांधकाम फुटून या बंधाºयालगतचा मोठ्या प्रमाणात असलेला मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे तर उर्वरित बंधारादेखील फुटण्याच्या मार्गावर आहे. जायकवाडीकरिता भावली, वाकी, भाम धरणांतून दारणा पात्रात अतिरिक्त प्रवाहाने पाणी सुटल्याने बंधाºयाच्या दोनही बाजूने पिचिंगचा भरावही मोठ्या प्रमाणात फुटला आहे. गतवर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यातच डिसेंबर महिन्यापासूनच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पशुधन, चारा, नागरिकांसाठी पिण्याच्या पाणी दोनही गावांसाठी येणारे संकट आहे. साठवण बंधारा अत्यंत महत्त्वाचा असल्याने जलसंपदा विभागाने तातडीने बंधारा डागडुजी करावी.
- हरिश्चंद्र चव्हाण,
सरपंच, माणिकखांब