लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:46 PM2020-06-14T23:46:40+5:302020-06-15T00:17:38+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने घोड्यांचा सांभाळ करणारे व्यावसायिक अडचणी आले आहेत.

Stopping at the wedding party to haul the horse; The time of famine came upon the merchants | लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : उपस्थितीची मर्यादा वाढवूनही विवाह पार पडतात साध्या पद्धतीनेच

आकाश गायखे । चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने घोड्यांचा सांभाळ करणारे व्यावसायिक अडचणी आले आहेत.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शासनाने शिथिलता दिली आहे. त्यामुळे ५० मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी २० मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडत होते. आता वºहाडींची संख्या वाढवली असली तरी अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडत आहेत.
वास्तविक पाहता, विवाह समारंभ म्हटला की मोठा बडेजावपणा असतो. प्रत्येक जण किती मोठे कर्ज झाले तरी चालेल असे म्हणत थाटामाटात लग्न समारंभ करतात. वराची वरात काढण्यासाठी खास घोडा मागविला जातो. नाशिक शहरासह ग्रामीण भागात विवाहसमारंभात मिरवणुकीला घोडा भाड्याने उपलब्ध करून देणारे अनेक व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून हा कालावधी लग्नसराईचा असतो, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घातल्याने अडचण निर्माण झाली आहे.
विवाहापूर्वी वराची घरापासून ते लग्न मांडवापर्यंत मिरवणूक काढली जात असे. तासभर वापरण्यात येणाºया शाही घोड्यासाठी साधारणत: पाच ते सहा हजारापर्यंत भाडे आकारले जायचे. परंतु यंदा मिरवणूक बंद असल्याने घोडे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

Web Title: Stopping at the wedding party to haul the horse; The time of famine came upon the merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.