तुफान आलं या... : सिन्नर तालुक्यातील खोदकामात जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा सहभाग वडझिरे, धोंडबारला कर्मचाºयांकडून श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:14 AM2018-04-27T00:14:27+5:302018-04-27T00:14:27+5:30
सिन्नर : पानी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदानासाठी सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांचे ‘तुफान आलंया..’चा अनुभव वडझिरे व धोंडबार या दोन गावांमध्ये आला.
सिन्नर : पानी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदानासाठी सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांचे ‘तुफान आलंया..’चा अनुभव वडझिरे व धोंडबार या दोन गावांमध्ये आला. या दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजार कर्मचाºयांनी सुमारे ११५ समतलचर खोदून सुमारे तीन तास काम केले. वडझिरे व धोंडबार येथील ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, सर्व खातेप्रमुख व कर्मचारी श्रमदानात सहभाग घेतला. वडझिरे येथे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, नितीन बच्छाव, बी. पी. साळुंके, बी. व्ही. देसले, हेमंत काळे, विष्णुपंत गर्जे, अरुण डोमाडे या जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांसह सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाणी, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार व पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख व कर्मचाºयांनी श्रमदानास प्रारंभ केला. वडझिरे येथील श्रमदानात शिक्षण, ग्रामपंचायत, आरोग्य, बांधकाम, लपा, पशुसंवर्धन या खात्याचे सुमारे ५५० कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी साडेसहापासून साडेनऊ वाजेपर्यंत या कर्मचाºयांनी सुमारे ६० समतलचर खोदले. ग्रामस्थांच्या सोबत श्रमदानात कर्मचारी सहभागी झाल्याने एका दिवसात श्रमदानातून मोठे काम झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी वडझिरे येथे तासभर श्रमदान केल्यानंतर ते धोंडबार येथे ए. बी. लांडगे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाणी व रत्नाकर पगार यांच्यासोबत पोहोचले. पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, डॉ. मिलिंद भणगे, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे यांच्यासह सर्वच खातेप्रमुख सहभागी झाले होते. सर्वांनी एकजुटीने काम करीत पाणीदार गावासाठी परिश्रम घेतले. श्रमदान करताना दोन्ही गावांत विविध घोषणा देत पाणीदार गावासाठी संकल्प करण्यात आला.