जिल्ह्यात वादळाने पडझड

By Admin | Published: May 15, 2017 11:50 PM2017-05-15T23:50:20+5:302017-05-15T23:50:35+5:30

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे शनिवारी जिल्ह्णातील ग्रामीण भागात जोरदार वादळ होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली.

The storm in the district collapsed | जिल्ह्यात वादळाने पडझड

जिल्ह्यात वादळाने पडझड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे शनिवारी जिल्ह्णातील ग्रामीण भागात जोरदार वादळ होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शनिवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने ग्रामीण भागात हजेरी लावली. कडकडाट करीत कोसळलेल्या विजेमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दोघे जखमी झाले. नाशिक तालुक्यातील देवरगार येथील कैलास विष्णू मोंढे हा वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे येथील पुंडलिक लक्ष्मण हसन हेदेखील वीज पडून जखमी झाले. मौजे नांदगाव कोहळी येथे वादळी वाऱ्याने पाच घरांचे पत्रे व झाप उडून गेले. इगतपुरी तालुक्यातील नाळुंगे येथे सहा घरांचे तसेच मौजे सामनेरे येथे मंदिर व शाळेचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

Web Title: The storm in the district collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.