वादळी वाऱ्याने १३५ वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 10:08 PM2020-06-04T22:08:44+5:302020-06-05T00:36:05+5:30

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्र ीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहरातील विविध उपनगरांमध्ये सुमारे १३५ लहान-मोठे वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली.

The storm knocked down 135 trees | वादळी वाऱ्याने १३५ वृक्ष कोसळले

वादळी वाऱ्याने १३५ वृक्ष कोसळले

Next

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्र ीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहरातील विविध उपनगरांमध्ये सुमारे १३५ लहान-मोठे वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली. संध्याकाळी ७ वाजेपासून आतापर्यंत नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह पाच उपकेंद्रांचे जवान बंबासह विविध भागांमध्ये दाखल होऊन रस्त्यांवर कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कापून अडथळा दूर करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने रात्री झेपावले. वादळाचा तडाखा प्रत्यक्षरित्या नाशिक जिल्ह्याला बसला नसला तरी त्याच्या प्रभावाने मात्र जिल्ह्यात हाहाकार माजविला.
शहरात वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. सुमारे शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस रात्री साडेआठ वाजेपासून पुढे पहाटेपर्यंत पडल्याची नोंद झाली. यावरून वादळी पावसाची तीव्रता सहज लक्षात येते. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळले. गडकरी चौकातील आयकर भवनामध्ये असलेला अत्यंत जुना महाकाय वटवृक्षदेखील उन्मळून पडला.
संध्याकाळी वेगावे वाहणाºया वाऱ्यांमुळे झाडे एखाद्या झोक्यासारखे हलू लागले होते. झाडांच्या फांद्या थेट जमिनीला भिडू लागल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेपासून शहरातील विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आणि अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह विविध उपकेंद्राचे
दूरध्वनी खणखणू लागले. सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये वृक्ष कोसळळ्याची माहिती मिळाली.
------------------------
इंदिरानगरात दोन वृक्ष पडले
इंदिरानगर : मुसळधार पाऊस व वाºयामुळे दोन मोठी वृक्ष उन्मळून पडले. पाटील गार्डनमध्ये गुलमोहर व शिवाजीनगर येथे कडुलिंबाचे वृक्ष उन्मळून पडले, तर श्रीराजसारथी सोसायटी, बापू बंगलालगत भाभानगर, सहकारनगर, पूर्णिमा आदी ठिकाणी वृक्षाच्या फांद्या तुटल्याची घटना घडली आहे.

Web Title: The storm knocked down 135 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक