गडगडाटी हास्याचे तुफान ‘यदा कदाचित’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:38+5:302021-03-14T04:14:38+5:30
नाशिक : अडीच दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर गडगडाटी हास्याची कारंजी उसळविणारे तुफानी विनोदी नाटक म्हणून सर्वज्ञात असलेल्या ‘यदा कदाचित’ ...
नाशिक : अडीच दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर गडगडाटी हास्याची कारंजी उसळविणारे तुफानी विनोदी नाटक म्हणून सर्वज्ञात असलेल्या ‘यदा कदाचित’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने रविवारी (दि. २१) करण्यात आले आहे. प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करण्यात अव्वल असलेले हे नाटक प्रदीर्घ काळाने नाशिकच्या रंगभूमीवर येणार आहे. कालिदास कलामंदिरात रविवारी सायंकाळी ५.३० वाजता या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.
‘लोकमत सखी मंच’ सदस्य आणि इतरांसाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स विजेत्या या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर हाऊसफुल्लचा बोर्ड मिळविण्याचे भाग्य फार कमी नाटकांना लाभते. अशा अफलातून नाटकांमध्ये ‘यदा कदाचित’ची गणना होते. संतोष पवार यांना लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या या नाटकाने मराठी रंगभूमीला अनेक नवनवीन कलाकार दिले. श्री दत्त विजय प्रॉडक्शनच्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ काळ साम्राज्य गाजविले असून, या नाटकाचा प्रयोग नाशिकला खूप काळानंतर होत असल्याने प्रेक्षकांनाही नाटकाबाबत उत्सुकता आहे. या नाटकासाठी सखी मंच सदस्यांकरिता एका कार्डावर दोन तिकिटे आणि प्रत्येकी केवळ १०० रुपये तर इतरांसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच तिकिटावरच चितळे एक्सप्रेसचे ७५ रुपयांचे मोफत खरेदी कूपन नागरिकांना मिळणार असून, त्यावर २१ तारखेपासूनच वस्तू मिळू शकणार आहेत. नाटकाची तिकिटे लोकमत शहर कार्यालय, शरणपूर रोड तसेच ‘लोकमत’च्या अंबड कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत.
इन्फो
कोरोना नियमांच्या पालनासह प्रयोग निश्चित
कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून कालिदास कलामंदिरात हा प्रयोग २१ मार्चला निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे रसिक सखींनी आणि नागरिकांनी त्यांच्या तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोगो
सखी मंच लोगो वापरावा.