वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:25+5:302021-05-18T04:15:25+5:30

सिन्नर तालुक्यात सकाळपासून सोसाट्याचा वारा होता. पाऊस नसला तरी वादळामुळे अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागला. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या. ...

The storm uprooted many trees | वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले

वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले

Next

सिन्नर तालुक्यात सकाळपासून सोसाट्याचा वारा होता. पाऊस नसला तरी वादळामुळे अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागला. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनेकांचे कांदा काढणीचे काम सुरू होते. अशा शेतकऱ्यांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्यासह झाडांच्या फांद्या पडल्या. उजनी येथे विमल सुरसे यांचे आंब्याचे झाड पडून मोठे नुकसान झाले. अनेकांच्या कांदाचाळीचे नुकसान झाले. काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. सिन्नर तालुक्यात कमीअधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, पंचनामा करण्याची मागणी केली जात आहे.

इन्फो

वावीत पपईबागेचे नुकसान

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी शिवारात शहा रस्त्यावर शंकर रसाळ यांच्या पपईच्या बागेला वादळाचा चांगलाच तडाखा बसला. रसाळ यांच्या पपईबागेत झाडाला मोठ्या प्रमाणात पपया आल्या होता. वादळामुळे अनेक पपया पडण्यासह पपईचे १५ ते १६ झाडे उन्मळून पडली. यात रसाळ यांचे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

फोटो - १७ सिन्नर रेन

वावी येथे शंकर रसाळ यांच्या पपईबागेचे वादळामुळे झालेले नुकसान.

===Photopath===

170521\17nsk_32_17052021_13.jpg

===Caption===

फोटो - १७ सिन्नर रेन  सिन्नर तालुक्यातील वावी येथे शंकर रसाळ यांच्या पपई बागेचे वादळामुळे झालेले नुकसान. 

Web Title: The storm uprooted many trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.